ना.मुंडेंचा राजीनामा घ्या,अन्यथा आंदोलन तीव्र करू….अंजली घोटेकर

0
174

.

महाविकास आघाडी सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे विरुद्ध रेणू अशोक शर्मा नामक महिलेने अत्याचाराचे गंभीर आरोप करीत मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.आणि नंतर मुंडे साहेबांनी फेसबुक वर त्याचा खुलासा केला.त्यांच्या या खुलास्याला काही अर्थ नाही.विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे.तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल, अशी चेतावणी भाजपा चंद्रपुर महानगरच्या जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांनी दिली.
त्या महाविकास आघाडी सरकार विरुद्ध व ना.धनंजय मुंडे याचा निषेध नोंदवताना धिक्कार आंदोलनाचे नेतृत्व करतांना बोलत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथे सोमवार(१८ जानेवरी)ला बोलत होत्या.
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे,महापौर राखी कंचर्लावार,महिला मोर्चा महामंत्री शिला चव्हाण,प्रज्ञा (गंदेवार) बोरगमवार,सपना नामपल्लीवार,उपाध्यक्ष चंद्रकला सोयाम, सुषमा नागोसे ,प्रभा गुडधे, कविता जाधव, लीलावती रविदास, किरण भडके, मंजुश्री कासंगोट्टूवार, सचिव पुनम गरडवा,आशा आबोजवार, किरण बुटले, अर्चना उरकुडे,विशाखा राजूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
घोटेकर म्हणाल्या,ना.धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा सोबतचे संबंध मान्य करीत तिचे पासून अपत्य असल्याचे कबूल केले आहे.हेच नाहीतर त्यांना आपले नावही दिले.परंतु ही माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात देण्यात आली नाही.ही शसनाचीच नाही तर निवडणूक आयोगाची दिशाभुल आहे.या पेक्षाही गंभीर बाब म्हणजे रेणू शर्माने केलेले आरोप आहेत.एखादा आरोपी मंत्री समाजातील पीडित महिलांना कसा न्याय देईल..?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.छत्रपती शिवाजी महाराजांचा  आदर्श जपण्याची भाषा बोलणारे या राज्याला लाभले.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ना.मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.या प्रसंगी वनिता कानडे यांनीही मार्गदर्शन केले.धिक्कार आंदोलनाला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांनी भेट दिली.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
संचालन व प्रास्ताविक शिला चव्हाण यांनी केले.तर अंजली घोटेकर यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी लता तुम्मे,माया उईके, निर्मला उईके, विशाखा राजूरकर, वंदना संतोषवार, रमिता यादव, सुनिता चव्हाण, लालमुनी चव्हाण, मीना किशोर, उषा शास्तीकर, निर्मला लेनगुरे, वंदना राधारपवार यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here