स्तंभ लेखन : बालमनाचा विचार व सामाजिक घटकांची जबाबदारी” निलेश जक्कुलवार

0
467

 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचले की बालके हरवली, बालके निसटली, पालकांनी सोडून दिले, बालकांकडून अपचारीक कृत्य झाले. परंतू यामागचे सत्य जाणुन घेण्याचा सहजासहजी कुणी विचारही करीत नसावा. बालकांकडे देशाचे भविष्य म्हणुन पाहल्या जाते परंतू त्याच बालकांचे संगोपन करण्यास आपण कुठेतरी कमी पडतो याकडे लक्ष दिले जात नाही व नंतर त्याचेकडून चुक झाल्यास त्यालाच पालकांकडुन, समाजाकडून दोषी ठरवले जाते त्यामुळे तो आणखी वाईट मार्गाकडे वळण्याचा प्रयत्न करतो आणि स्वताचे भविष्य खराब होण्याच्या मार्गावर आहे याची त्याला पुसटशी कल्पनाही नसते.

बालकाला घडविण्याकरीता समाजातील प्रत्येक घटक हा त्याचेसाठी महत्वाचा आहे, जन्मापासून वयाचे पंधरा ते सतरा वर्ष बालके की कुटुंबात, समाजात वावरतात त्या दरम्यान तो कसा वागतो, त्याचे वर्तन कसे आहे, त्याचे व्यवहार कसे, तो कोणासोबत राहतो, शिक्षण घेत आहे की नाही, त्याची संगत कशी आहे याकडे दुर्लक्ष होते आणि अनपेक्षीतपणे त्याचेकडून अपचारीक कृत्य घडल्यास आपण तो क्षणातच सुधरावा याची दुस.याकडुन अपेक्षा करतो म्हणजे हे एखादा गंभीर आजार झाल्यास त्यास रूग्णालयात नेल्याबरोबर दुरस्त व्हावा अशी आशा बाळंगल्यासारखे नाही का? म्हणजे प्रत्येकच जण जर समस्या निर्माण झाल्यावरच त्यावर उपाय अथवा इलाज करू असे विचार करून बसला तर एके दिवशी एवढी गंभीर समस्या निर्माण होईल की ती हाताबाहेरची होईल आणि यावर उपाय करणेही कठीण होईल मग अशी परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभुत कोण याचाही गंभीरतेने विचार व्हायला पाहीजे. समाजात वावरतांना प्रत्येकालाच अधिकार, कर्तव्य, जबाबदारी आहे परंतू तो त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे. जर प्रत्येकाने जबाबदारीने न वागता दुस-यावर अवलंबून राहण्याचा विचार केला तर त्यात नुकसान होत असते.

अल्पवयीन कोणत्याही बालकाने अपचारीक कृत्य केल्यास त्यास बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार मा. बाल न्याय मंडळ यांचे आदेशाने निरीक्षणगृहात दाखल केले जाते त्यास ‘विधी संघर्षग्रस्त बालक” म्हटले जाते. त्याठीकाणी वास्तव्य कालावधी दरम्यान बालकाच्या समस्येचे निराकरण करण्याकरीता, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता समुपदेशन, मार्गदर्शन केले जाते, शिक्षण, प्रशिक्षण, पुर्नवसन यादृष्टीने त्यास संदर्भसेवा पुरविल्या जातात. काही दिवसानंतर बालकास कुटुंबात समायोजीत केले जाते त्यानंतर बालकास सामावून घेवून योग्य मार्गाने नेण्याकरीता त्याचेकडे नकारात्मक भावनेने न पाहता पालक,
कुटुंब, समाज तसेच इतर संबधीत यंत्रणा यांचे सुध्दा योगदान तेवढेच महत्वाचे आहे शेवटी यावरून एकच दिसुन येते की बालकास घडविण्याचे कुण्या एकटयाचे कार्य नसून टिम वर्क आहे व समाजातील प्रत्येक घटक तेवढाच महत्वाचा आहे.

परराज्यातील व राज्यातील बालकाला काही पालक स्वता कारखाना, कंपनी कींवा इतर ठीकाणी ठेकेदारांमार्फत गावापासून दुर परगावात कामावर पाठवून त्याचा मोबदला पालक घेत असतात. पण यादरम्यान बालकाचा छळ तर होत नसावा? त्याची उपासमार करून बळजबरीने काम तर करीत लावत नसे ना? तो मनाने तीथे राहण्यास तयार आहे की नाही? त्याला कैद करून ठेवलं तर नाही ना? अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांचा विचार तरी पालकांना, कुटुंबाला येत नसावा का? पोटचं काळीज काही समजायच्या आतच आपल्यापासुन दुर आहे याची खंत त्यांना वाटत नसावी का? पालक केवळ पसाभर पैश्यासाठी त्याचे जीवन उध्वस्त करण्याच्या मागे लागतात परंतू त्याला शिक्षण देवू, मोठं करू, चांगल बनवु, सक्षम बनवु असा विचार करून मन मोठं करू शकत नाही का? बालकांचे बालमनावर कारय परीणाम होत असेल असा पुसटसा विचार पालक तर करीत नाही परंतू कारखानदाला सुध्दा दया, विचार येत नसावा का? कायदयाने बालमजूर ठेवणे गुन्हा आहे तरी पण असे प्रकार घडत असल्याचे दिसतात. स्वताच्या बालकाविषयी पालकांना काहीच वाटत नसेल तर आपल्या जिवनात तो यावा अशी अपेक्षा करणे कीतपत योग्य आहे. आज बालकास घडवले तर तोच उदया कुटुंबाचा आधार होवु शकतो परंतू त्याच्या विकासाच्या वाटेवरच आपण आडवे झालो तर भविष्य अंधकारमय आहे हेच समजावे.

प्रवासादरम्यान बालक आपल्या कुटुंबासोबत असतो, या दरम्यान रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मोठया शहरात कधी कधी चुकामुक झाल्याने बालक पालकांपासून निसटतो. बराच वेळ पालकांचा शोध घेवूनही पालक सापडत नाही त्यानंतर त्यांना पोलीस, चाईल्ड लाईल मार्फत मा. बाल कल्याण समिती यांचे आदेशाने बालगृहात दाखल केले जाते अशा बालकांना “काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके” म्हटले जाते, यात पिडीत, हरवलेली, भटकलेली, घरून निघुन आलेली, संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत बालके येतात. नंतर पालकांचा शोध संबधीत यंत्रणेमार्फत घेवून कागदपत्रांची पुर्तता करून बालकास पालकांचे ताब्यात दिल्या जाते कींवा संबधीत जिल्हयात, राज्यात स्थानांतरण केले जाते. परंतू कधी कधी झोपडपटीतील, मागास भागातील गरीब कुटुंबातील बालकांना दाखल केल्यास त्यांचेकडे ओळखपत्र, कागदपत्रे नसतात अशा वेळेस बालकाची पालकांसोबत जाण्याची व पालकांना बालकास नेण्याची तिव्र इच्छा असुनही कागदपत्रांअभावी त्यास ताब्यात देण्याची कार्यवाही होवू शकत नाही. अशा परीस्थितीत बालक जास्त दिवस झाल्यांनतर सदर प्रक्रीये दरम्यान तो पलायन करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी
आपण कीतीही समजावनू सांगीतले आणि बालकाची बालगृहात राहण्याची व पालकांची ठेवण्याची इच्छा नसल्यास अडचणी निर्माण होतात व तो नजर चुकवून निघुन जाण्याचा वारंवार प्रयत्न करतो व संधी शोधत असतो. बालक व पालक एकमेकांना ओळखुनही कागदपत्रांमुळे एकत्रीत जावु शकत नाही अशा वेळेस बालकाचे मनाविरूध्द दाखल ठेवणे अवघड जाते कारण त्याला पालक समोर दिसत असतांना सुध्दा पालकासोबत जावू देत नाही व कैदेत ठेवत आहे असा सुरवातीला त्याचा भ्रम होतो नंतर कालांतराने तो सामान्यपणे राहण्यास सुरवात करतो. त्यामुळे असे प्रसंग येणार नाही याची काळजी आधीच पालकांनी घेतली तर बालकांना सुध्दा विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही व बालकाची चुक नसतांना सुध्दा सदर प्रकीयेचा फटका बसणार नाही.

वरील सर्व बाबींचा विचार केला असता असे वाटते की जर आपण समस्या निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणे आणि एखादया वेळेस झाली तर त्यास पुर्वपदावर आणुन चांगले जगण्यास, वागण्यास मदत करण्यात हरकत नसावी, कारण याकरीता एकटयावरच अवलंबुन न राहता समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घ्यावा व बालकांबाबत सकारात्मक विचार करून आधार दयावा.

                                   निलेश प्रभाकर जक्कुलवार,

  समुपदेशक तथा प्र. परिविक्षा अधिकारी शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, चंद्रपूर मो.न.            9823864392

ई मेल. nileshjakkulwar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here