Nagpur : मुलींसाठी उतरवण्यात आले आपत्कालीन स्थितीत विमान

306

नागपूर : लखनौ पासून मुंबईला जाणाऱ्या विमानाला मंगळवारी सकाळी नागपूर हवाई अङ्क्यावर आपत्कालीन स्थितीत उतरवल गेलं. त्यानंतर त्या विमानात प्रवास करणार्या 8 वर्षीय मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण दुर्दैवाने तिचा तिथे मृत्यू झाला. मुलगी तिच्या आई वडिलांसोबत विमान प्रवास करत होती.

मुलगी उत्तर प्रदेशच्या सिध्दार्थ नगरच्या सहेरिखास गावातली असून उपचारासाठी तिला लखनौ पासून मुंबईला नेण्यात येत होते.

प्रवासा दरम्यान मुलीची तब्येत बिघडल्यामुळे विमान नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. मुलीला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले . तिथे तिचा मृत्यू झाला असल्याचे अधिका-यांनी सांगितले.