जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांची अंतरिम यादी प्रसिद्ध

137

चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत अनुकंपाधानक उमेदवारांची अंतरिम यादी कार्यालयाचे संकेतस्थळावर व सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून यासंबधात 29 जानेवारी 2021 पर्यंत आक्षेप सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.
रिट याचिका क्र.२०१४/२०१९ संबंधाने मा.उच्च न्यायालयाने पारीत केलेल्या अंतीम निर्णयानुसार दि.1 फेब्रुवारी 2019 रोजीच्या स्थितीस अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारीत अनुकंपा प्रतिक्षासूचीत समाविष्ट अनुकंपाधारकांना पदभरती-२०१९ चे अनुषंगाने नियुक्ती देण्याकरिता प्रवर्गनिहाय उपलब्ध पदे व अनुकंपा धारकाची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन अंतरीम निवड यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद,चंद्रपूर कार्यालयाचे zpchandrapur.maharashtra.gov.in व enoticeboard-zpchandrapur.com या संकेतस्थळावर दि.19 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर अंतरीम निवड यादीवर अनुकंपा धारकास आक्षेप/हरकती असल्यास अर्ज व आक्षेपाशी संबंधीत आवश्यक दस्तऐवज दि. 29 जानेवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या आक्षेपाचा/हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व अनुकंपा धारकांनी नोंद घ्यावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) श्याम वाखडे यांनी कळविले आहे.