गोंडवाना गणतंत्र पक्ष बळकटी साठी जोमाने कामाला लागा – पांडुरंग जाधव

108

जिवती-  पाटण येथे झालेल्या स्वर्गीय गोदरू पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली कार्यक्रमात राजुरा विधानसभा कोरकमिटी अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी गोंडवाना पक्ष बळकटी साठी कार्यकत्यांनी जोमाने कामाला लागावे व कुठल्याही ईतर पक्ष व नेत्यांच्या बोगस लालचेला बळी न पडता पक्ष वाढीसाठी कार्य करावे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात अध्यक्ष-पांडुरंग जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर,प्रमुख उपस्थिती बाबुराव मडावी जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी,गजानन पाटील जुमनाके राजुरा विधानसभा अध्यक्ष,महेबूब शेख प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश,ममताजी जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना,अब्दुल जमीर अब्दुल हमीद उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी,भीमराव पाटील मेश्राम माजी सभापती, प्रभाकर उईके,वागूजी उईके युवा नेते, पाटण,भारत आत्राम महासचिव,प्रदीप कुलमेथे सरपंच कान्हालगाव, जमालूदिन शेख जिवती,संजू सोयाम युवा नेता,बंडूजी कुमरे,लक्ष्मण कुलमेथे, संजू पाटील आत्राम देवाडा,भीमराव पाटील जुमनाके,हनमंतु कुमरे माजी सरपंच,गणपत कुमरे,अरुण उद्दे सरपंच,खमानराव तोंडास,राधाताई आत्राम माजी नगरसेविका,अर्जुन सिडाम,अरुणा पेंदोर,दिनकर कोडापे,दोलत मेश्राम,भीमराव गेडाम,बलहर्षा आत्राम,हे प्रामुख्याने उपस्थित होते.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच सत्कार – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे निर्वाचित उमेदवार शीला पढरे,निर्मला मरसकोल्हे काढोली,संगीत मडावी,हस्तक बिरबल,शत्रुघ्न सेडमाके, सुषमा कानुरवर, संजय देशमुख,निर्मला मरस्कोल्हे,सीताबाई पांढरे,अर्चना आत्राम,दिनकर कोडापे यांच सत्कार करण्यात आला.
अनेकांचं पक्ष प्रवेश – चिखली ग्रामपंचायत येथील भाजपचे उप सरपंच सुधाकर जाधव,माजी सरपंच चिनू पाटील कोटनाके,माजी सरपंच भीमराव गेडाम,वासुदेव गेडाम ग्रामपंचायत सदस्य,देशमुख रामजी यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी व गजानन पाटील जुमनाके यांच्यावर पांडुरंग जाधव यांच्यावर विश्वास ठेवत गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश केला.
फारुख अब्दुल शेख यांची राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी या पदी नियुक्ती करण्यात आली.