घुग्गुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांनी घेतली पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट*

0
134

 

घुग्गुस काँग्रेसचे नेते व माजी घुग्गुस काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी यांनी नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवर यांची भेटी घेऊन आगामी होणाऱ्या घुग्गुस नगरपरिषदेच्या होणाऱ्या पहिल्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा केली.
आणि घुग्गुसच्या जनतेची भावना लक्षात घेऊन घुग्गुस नगरपरिषदेची घोषणा केल्या बद्दल त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचाली करिता त्यांचा आशीर्वाद घेतला.

नुकतीच घुग्गुस नगर परिषदेची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच घुग्गुस नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहे.
त्यामुळे होणाऱ्या आगामी पहिल्या घुग्गुस नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात घुग्गुस काँग्रेसचे नेते व माजी काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी यांनी काँग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळासह नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि घुग्गुस नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा केली.
चर्चे दरम्यान पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी लवकरच घुग्गुस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेण्यात येईल असे काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी व कॉग्रेस शिष्टमंडळास सांगिलते आहे.

यावेळी घुग्गुस काँग्रेसचे जेष्ठ नेते, महिला पदाधिकारी व युवक काँग्रेस नेते व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

घुग्गुस नगर परिषदेची घोषणा होताच आगामी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

त्यामुळे घुग्गुस काँग्रेसचे नेते व माजी काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी यांनी घुग्गुस नगरपरिषदेवर काँग्रेसचा ताबा मिळविण्यासाठी आणि घुग्गुस नगरपरिषद काबीज करण्यासाठी व पूर्वनियोजित रणनीती आखण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेऊन होणाऱ्या घुग्गुस नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकी संदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे आता घुग्गुस नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे आता वाहू लागल्याची सुरवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here