हळदी कुंकू लावीत दिले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार !

0
193

चंद्रपूर – महिलांमधील दुरावा संपविणारा सण म्हणजेच मकरसंक्रांती या दिनी महिला एकमेकांच्या घरी जात आपसात वाण वाटतात मात्र या प्रथेला एक आगळंवेगळं स्वरूप चंद्रपूर मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी दिलं.
मनसे महिला जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्या राजगड या संपर्क कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावीत महिलांमध्ये शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील गाथा असलेलं पुस्तक सर्वाना वाटप करण्यात आले.
सुनीता गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की आजच्या आधुनिक जगात शिक्षण महत्वाची गोष्ट आहे, आपण महिला आहोत म्हणून मागे रहायचं नाही, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची प्रेरणा घेत या जगाला आपली उपस्थिती दर्शवा.
आयोजित कार्यक्रमात मनसे महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे,शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके,जिल्हा उपाध्यक्ष शकुंतला लिपटे,शहर उपाध्यक्ष विमल लांडगे,शहर उपाध्यक्ष शकुंतला रंगारी,शहर उपाध्यक्ष अर्चना वासनिक,शहर उपाध्यक्ष वाणी सदलावार , अँडवोकेट विना बोरकर,प्रतीक्षा सीडाम,अध्यक्ष वंदना वाघमारे, विभाग अध्यक्ष मीनाक्षी जीवने,रोशनी आमटे, कुसुम धुळे,रोशनी लांडगे,विमल भटवलकर व इतर असंख्य महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here