अनाथ व मतिमंद मुलांच्या मागण्या करिता आमरण उपोषण सुरू

0
91

शाळा संचालकांची सरकार कडे टाहो…

चंद्रपूर –     आर्थिक परिस्थिती नसल्या मूळे अनाथ व मतिमंद मुलांची जबाबदारी सरकारनी घ्यावी या मागणी करिता संस्थाचालक अनाथ व मतिमंद मुलांसह आमरण उपोषणाला बसणार संबंधीचे दहा दिवसा अगोदर जिल्हाधिकारी, पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री , पुलीस अधीक्षक याना निवेदन दिले व  पत्रकार परिषद घेतली त्याची दखल घेऊन सर्व प्रसार माध्यमांनी बातम्या  प्रकाशित केल्या तरी पण निष्ठउर शासनाला जाग आली नाही  म्हणून आज उपोषणाला बसलो असल्याचे संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी सांगितले

जिल्ह्यातील नागभीड येथे लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची शाळा व स्वामी विवेकानंद मुलाचे बालगृह वर्ष 2011 पासून अविरत सुरू आहे मात्र मतिमंद शाळेला शासनातर्फे अजूनही अनुदान प्राप्त झाले नसून सध्या 7 विद्यार्थी शाळेत असून त्यामधील 2 विद्यार्थी हे 18 वर्षाखाली असून उर्वरित 5 विद्यार्थी हे 18 वर्षावरील आहे. मतिमंद शाळेत नियमानुसार 18 वर्षेआतील असणाऱ्या मुलांना ठेवता येते मात्र सर्व मुले हे अनाथ असल्याने संस्था अजूनही मुलांचे पालन करीत आहे मात्र शासनाद्वारे कसलीही मदत शाळेला मिळाली नाही.

सदर शाळा ही शासनाच्या अहवालात श्रेणीत आहे मात्र अजूनही शाळा ही कायम विना अनुदानित तत्वावर काम करीत आहे, 3 वर्षांपासून मतिमंद मुले अनुदान मिळणाऱ्या शाळेत स्थलांतरित करावे यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

कोरोना काळात शासनाने रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना अन्न धान्य दिले मात्र मतिमंद शाळेला अशी कसलीही मदत करण्यात आले नाही अनाथ व मतिमंद मुले भारताचे नागरिक नाही का असा प्रश्न संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी केला आहे

शासनाने विशेष बाब म्हणून कायम विना अनुदानित शाळेला अनुदान सुरू करावे अन्यथा उद्या 25 ला आमरण उपोषणाला बसणार असल्याचे माहिती चौधरी यांनी चंद्रपूर वार्ताला दिली
15 ऑगस्ट 2020 ला जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांना सदर बाबीसाठी निवेदन दिले व त्यांनी विशेष बाब म्हणून तात्काळ प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन सुद्धा दिले मात्र आजपर्यंत असा कुठलाही प्रस्ताव शासनाजवळ दिला नाही, पालकमंत्री वडेट्टीवार यांचं आश्वासन हवेतच विरले. शासनाकडून संस्थेला कसलीही मदत मिळत नाही, संस्थाचालक हे कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे, आजपर्यंत संस्थाचालकांनी सेवा म्हणून मतिमंद मुलांना सांभाळले मात्र कोरोना काळात सर्वाना अडचणी आल्या, शासनस्तरावर पाठपुरावा केला गेला मात्र निष्ठुर शासनाचं संस्थेच्या मागणीकडे लक्ष गेले नाही  वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने 25 जानेवारी पासून जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला बसलेल्या सात मुले असून दोन अठरा  वर्षाखाली असून पाच अठरा वर्षाच्या वर आहेत,मतीनंद मुलाच्या बाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन ,मुलाचे भविष्याचा विचार करावा अशी मागणी उपोषण मंडपाला भेट देणाऱ्या सर्व पालक वर्गानी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here