जिल्ह्यात पुन्हा दहशत : राजुरा : कोळसा व्यावसायिक राजू यादव यांची गोळ्या घालून हत्या

1132

 

राजुरा : कोळसा व्यवसायात असलेले रामपूर येथील राजू यादव (वय ४५) यांची नाका नंबर 3 राजुरा येथे साळुंचे दुकानात अज्ञात इसमाने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना सायंकाळी ६:०० वाजता घडली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजू यादव हे जय भवानी ट्रक असोसिएशनचे सचिव असून त्यांचे स्वतःचे बजरंगबली ट्रान्सपोर्ट आहे ते बजरंग दलाचे महासचिव होते. बऱ्याच वर्षांपासून ते कोळसा वाहतुकीचा व्यवसाय करीत असून वेकोली परिसरात त्यांची चांगली ख्याती होती. ऐन वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजुरा शहरातील नाका नंबर 3 येथे सलूनच्या दुकानात सेविंग करीत असताना अज्ञात इसमानी दुकानात येऊन राजू यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. घटना घडल्यानंतर पोलीस उशिरा पोहचले असता घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाका नंबर तीन हे वर्दळीचे ठिकाण असताना त्याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी राहत नसून अवैद्य व्यवसायचे सूत्र चालणारे ठिकाण म्हणून नाका नंबर तीन असताना पोलिसांकडून या ठिकानाकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा आरोप होत होते, राजुरा शहरात पहिल्यांदा हि घटना घडल्याने शहरात पोलिसांबद्दल व अवैद्य व्यवसायाबद्दल ओरड होत आहे. मात्र कोळसा व्यावसायिक राजू यादव यांच्या हत्येने हळहळ व्यक्त होत आहे.