बेरोजगार तरून व शेतक-यांची अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार

0
81

         कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नौक-या गेल्यात तसेच दिल्ली येथे ऐतिहासीक असे शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या दोनही पार्श्वभूमीवर आजचा बजेट बेरोजगार तरुणांसह शेतक-यांना दिलासा देणारा ठरणार अशी अपेक्षा होती. मात्र सदर बजेटमध्ये रोजगार व शेतकरी या दोनही प्रमुख आणि ज्वलंत विषयांना सोयस्काररित्या बाजूला सारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यासाठी कोणतीही भरिव अशी तरतुद करण्यात आलेली नाही. त्यामूळे हा बजेट बेरोजगार तरुणांची व शेतक-यांची अपेक्षा भंग करणारा बजेट ठरला असल्याची प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर बोलतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

         केवळ ठरावीक राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात महाराष्ट्राच्या पदरी मोठी निराशा आली आहे. कृषी कायद्या विरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. या बजेटच्या माध्यमातून शेतक-यांसाठी भरिव तरतूरट करुन त्यांचे अश्रू पुसल्या जाण्याचे काम केल्या जाईल अशी अपेक्षा होती. तसेच कोरोनामूळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात मिळविण्यासाठी रोजगार उपलब्धीसाठीही यात तरतूद असायला हवी होती. मात्र या दोनही प्रमूख विषयांकडे अर्थसंकल्पात डोळेझाक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषनांचा पाऊस असुन यात बेरोजगार व शेतक-यांसाठी काहीही नसल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.  तसेच जिवनावश्यक वस्तूचे दरात वाढ होत असतांना  सोने चांदीच्या कस्टम ड्यूटीत केंद्र कपात करणार असल्याने सोने – चांदीचे दर स्वस्त तर  होणार आहे. याचा फायदा केवळ व्यापा-यांना होणार आहे. यात एल.आय.सीचे खाजगीकरण करण्यात येणार आहे हे चुकीचे असून यामूळे शासकीय कामात पैसे जास्तीत जास्त व्याजाने मिळेल असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here