सन 2021 या वर्षीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

0
218

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :

चंद्रपूर जिल्ह्यात सन 2021 या वर्षाकरिता स्थानिक सुट्टया जाहिर करण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केला आहे.
यानुसार तान्हा पोळा (पोळ्याचा दुसरा दिवस) मंगळवार दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी, पितृमोक्ष अमावस्या बुधवार दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी व धनत्रयोदशी मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा करिता सुटी घोषित करण्यात आली आहे. तथापी हा आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि बँका यांना लागू होणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here