नाफेडतर्फे तुर खरेदी सुरू

0
128

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : हंगाम 2020-21 मध्ये शासनाने तुर खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार दर मंजूर केला आहे. तुर खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत तुर खरेदी सुरू आहे. तुर खरेदीचा नोंदणी कालावधी 28 डिसेंबर 2020 पासून सुर झाला आहे. तुर खरेदी 20 जानेवारी ते 19 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.
ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नाही त्या तालुक्यांना खालीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर तालुकानिहाय जोडण्यात आले आहे.
चंद्रपूरसाठी भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल, वरोरा खरेदी केंद्रासाठी वरोरा तालुका, चिमुर खरेदी केंद्राला ब्रम्हपुरी सिंदेवाही व नागभिड, गडचांदुर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती, राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी व बल्लारपूर तालुके जोडण्यात आले आहेत.
तरी वरीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड व्होटींग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत तूर विक्रीकरीता खरेदी केंद्रावर जावे असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आर.गोगीरवार यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here