कविता :- “बालक”,,,,,,, एक उलणारी कळी :- निलेश जक्कुलवार

357

“बालक,,,,,,,एक उलणारी कळी

बालकांचे भविष्य आपल्या हाती !

म्हणुन सांभाळा व्यवस्थीत नाती !

करा मार्गदर्शन त्यास प्रत्येक वेळी  !

ओरडु नका चुकल्यावर ऐनवेळी !

प्रवृत्त करा घेण्यास नियमित शिक्षण !

नंतर सांगा घ्यायला प्रशिक्षण !

काळजी घ्या, लागणार नाही व्यसन !

तेव्हा कुठं होईल त्यांचे पुर्नवसन !

दिला आपण चांगल्या विचारांचा मंत्र !

तर होईल जिवन जगण्यास स्वतंत्र !

आज बालकांची पीढी पडतेय बळी !

उमलण्या आधीच जिवनाची कळी !

पालकांनो जागे व्हा, सावध व्हा, सतर्क रहा !

आणि आजच त्याचा भविष्यमय आरसा पहा !

पालकांनो दया आता तरी निट लक्ष !

की बालकांना बनवणार नाही भक्ष्य !

  निलेश प्रभाकर जक्कुलवार

समुपदेशक तथा प्र. परिविक्षा अधिकारी शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, चंद्रपूर मो.न. 9823864392

ई मेल. nileshjakkulwar@gmail.com