गडचांदूर येथील अवैद्य धंदे बंद करा – नाहीतर ठाणेदाराने राजिनामा द्यावा

0
278

नांदा फाटा(चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस उपविभागात मागील ७/८ महिन्यांपासून अवैध दारूविक्री , सट्टापट्टी , जुगार , कोंबडबाजार असे सर्व अवैध धंदे शासनाची परवानगी असल्यासारखे खुलेआम सुरू आहेत. अवैध व्यावसायिकांवर पाेलिसांची कुठलीही जरब उरली नाही पोलीसच अवैध व्यावसायिकांचे संरक्षक बनले आहेत.

नांदाफाट्यावरील वार्ड क्रमांक ५ मधील दारू पकडून दिली म्हणून कोरपना तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रितिका ढवस यांचे घरावर हल्ला चढवून त्यांचे परीवाराला मारहाण करण्यात आली यात बचावासाठी आलेले नांदा बाखर्डी गणाचे जिल्हा परिषद सदस्य व अल्ट्राटेक कामगार संघाचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे यांनाही मारहाण करण्यात आली लोक प्रतिनिधींना मारहाण केल्याने संतप्त नागरिकांनी साडेतीन तास चक्काजाम करुन गडचांदूर वणी राज्यमार्ग रोखून धरला होता व परिसरातील सर्व अवैधधंदे कायमचे बंद करण्याची मागणी केली होती. लोकप्रतिनिधिंना मारहाण केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेऊन स्वतः गडचांदूर पोलीस ठाणे गाठून प्रकरणातील माहिती जाणून घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी फक्त पाचच महिलांची भेट घेतली परंतु जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे व माजी कृषी सभापती अरुण निमजे यांची भेट नाकारली हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहेत दारू पकडल्यावर याबाबतची महिलांनी ३० जानेवारी रोजी पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावर लोकप्रतिनिधींना मारहाण करण्यात होते म्हणजेच येथील पाेलिसांचा कुठलाही वचक अवैध व्यावसायिकांवर नसल्याचे सिद्ध होते गडचांदूर पोलीस उपविभागात मागील ७/८ महिन्यापासून अवैध दारूविक्रीने थैमान घातले असून प्रत्येक वार्डा वॉर्डात घरोघरी मोठ्या प्रमाणात दारू विकली जात आहे सट्टापट्टी जुगार कोंबड बाजार अशा अनेक अवैध धंद्यांना मोठा ऊत आला आहे गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती अशा अवैध धंद्यांना आळा घालू शकत नाही तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी केली असून कोरपना तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण भाऊ निमजे यांनी अवैध धंद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here