अवैध गौण खनिज उत्खननातील पोकलँड मशीन जप्त

166

चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी :

जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या जिल्हा भरारी पथकाने जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता दिनांक 02 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजता मौजा मांनोर, ता. भद्रावती येथे भेट देवून पाहणी केली. यावेळी में.कर्नाटक इम्टा कोलमाईन्स लिमीटेड, यांचे क्षेत्रात मुरूम या गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या पोकलँड मशीन टाटा हिटाची एक्स 200 आयएलसी व हायवा क्र. 34 अेबी 6776 वाहन जप्त करण्यात आले.
उक्त वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलमातील विविध तरतुदीअन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.