सरपंच पदाच्‍या निवडणूकीत बल्‍लारपूर तालुक्‍यातील 10 पैकी 8 ग्राम पंचायतींवर भाजपाचा झेंडा

0
115

.

माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्‍लारपूर तालुक्‍यातील 10 पैकी ८ ग्राम पंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर तालुक्‍यात झालेल्‍या अभूतपूर्व विकासकामांमुळे 10 पैकी ८ ग्राम पंचायती ताब्‍यात घेत भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

बल्‍लारपूर तालुक्‍यातील हडस्‍ती ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी अंजली पारखी तर उपसरपंच पदी नारायण भोयर, नांदगांव पोडे ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी प्राजक्‍ता उरकुडे, कोर्टीमक्‍ता ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी गणपत टोंगे, उपसरपंचपदी सौ. जीवनकला टेकाम, पळसगांव ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी संदीप वेटे तर उपसरपंचपदी नितीन वांढरे, मानोरा ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी जिवनकला ढोंगे तर उपसरपंचपदी लहू टिकले, गिलबिली ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदी गोपिका बुरांडे तर उपसरपंचपदी देवीदास सिडाम, कळमना ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी सरला परेकर तर उपसरपंचपदी रूपेश पोडे, आमडी ग्राम पंचायतीच्‍या सरपंचपदी शिल्‍पा कुळसंगे तर उपसरपंचपदी धनराज चोथले यांची निवड झाली आहे. किन्‍ही ग्राम पंचायतीच्‍या उपसरपंचपदी भाजपाचे अशोक निब्रड विजयी झाले आहे.

या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ . वैशाली बुध्‍दलवार, अॅड. हरीश गेडाम, पंचायत समितीच्‍या सभापती सौ. इंदिरा पिपरे, उपसभापती सोमेश्‍वर पदमगिरीवार, बल्‍लारपूर तालुका भाजपाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, बल्‍लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती राजू बुध्‍दलवार, पंचायत समितीचे माजी सभापती गोविंद पोडे, श्रीमती विद्या गेडाम आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here