महानगर भाजपा सहकार मोर्चाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी कोलप्याकवार तर उपाध्यक्षपदी पुल्लावार

0
145

चंद्रपूर

भारतीय जनता पार्टी महानगर,सहकार मोर्चाची कार्यकारिणी आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांच्या उपस्थित नुकतीच जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी प्रशांत कोलप्याकवार यांची तर उपाध्यक्षपदी  सुरेश पुल्लावार यांची नियुक्ती करण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरचिटणीसपदी विजय वंडलवार, अशोक नंदूरकर यांची तर सदस्य म्हणून अमोल धोडरे,विजय निमसरकर,श्रीकृष्ण झाडे,संजय गुरनुले,दीपक मूडे, योगेश घाटे,शाम घरोटे,गुरुदास मंगर,पंकज नांदने,भीमराव ससाणे व मनोज गायकी यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर,जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here