महानगर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ तर्फे शिवगान स्पर्धा

0
70

भारतीय जनता पार्टी   सांस्कृतिक प्रकोष्ठ महानगर चंद्रपुरच्या  वतीने विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात शिवगान स्पर्धा २०२१ चे आयोजन मंगळवार( ९ फेब्रुवारी)ला आय एम ए सभागृह चंद्रपुर येथे सकाळी ११वाजता करण्यात आले आहे.अशी माहिती चंद्रपूर महानगर सांस्कृतिक प्रकोष्ठचे संयोजक जगदिश नंदूरकर व सहसंयोजक हेमंत गुहे यांनी दिली आहे.भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा आहे.
भाजपा सांस्कृतिक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे ही स्पर्धा राज्यस्तरावर घेतली जात असून १९ फेब्रुवारी शुक्रवारी शिवजयंतीला या स्पर्धेची अंतिम फेरी अजिंक्यतारा गड.जि. सातारा येथे  होणार आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपुर येथे हे आयोजन छत्रपती शिवरायांवरील पोवाडा,पाळणा,शिवस्फूर्तिगीत,आरती,ओवी, ललकारी,अभंग आदी प्रकारच्या गीतांसाठी करण्यात आले आहे.ही स्पर्धा खुली असून यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभागी होता येईल वैयक्तिक गायकांसाठी किमान ३ते७ मिनिटे व संघीकसाठी ५ते८ मिनिटे निश्चित करण्यात आले आहे.वैयक्तिक गीतांसाठी क्रमशःरु. ७०००,५०००,३०००० तर सांघिक गीतांसाठी रु ११०००,७५००,५००० सोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.या स्पर्धेत तमाम शिवभक्त कालावंत व रसिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी ९२८४१५५७०२,८५५२९०८५७०,९५४५५०१९४०,९८८११२६६७७ या क्रमांकावर साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यशस्वीतेसाठी अतुल येरगुडे,प्राची नांदलवार,अंकिता देशट्टीवार,प्रणाली कवाडे,विघ्नेश्वर देशमुख व सोनाली कवाडे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here