घंटागाडी सफाई कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

120

घंटागाडी सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडचा पाठींबा

किमान वेतन देण्यात यावे या मागणीकरिता घंटागाडी सफाई कामगारांच्या वतीने महानगरपालिकेसमोर ठिय्या देत आज पासून कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही आंदोलनाला भेट देत घंटागाडी सफाई कामगारांच्या सोबत असल्याचे सांगीतले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक राहूल मोहुर्ले, दुर्गा वैरागडे,  यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

चंद्रपूर शहर महानगरपालिका  येथील कंत्राटी घंटागाडी कामगार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतांना देखील  आपले कर्तव्य बजावत चंद्रपूर शहराला सुंदर व स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. असे असले तरी त्यांच्या विविध मागण्या प्रलंबीत आहे. त्यामूळे त्यांच्या मागण्या मान्य करण्यात यावा या मागणी करीता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनेकदा निवेदने देण्यात आली आहे. तसेच सदर मागणीसाठी घंटागाडी सफाई कामगारांना सोबत घेत २८ जानेवारीला मनपा समोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मागणी मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन पूकारण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानूसार आज पासून येथील घंटा गाडी सफाई कामगारांच्या वतीने चंद्रपूर शहर महानगर पालिकेपूढे बसून बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही या आंदोलनाला आपला पाठींबा जाहिर करण्यात आले असून यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहे. दरम्याण आ. किशोर जोरगेवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देत कामगारांसोबत चर्चा केली. कामगारांच्या मागण्या रास्त असून त्या मान्य झाल्या पाहिजेत, या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेड घंटागाडी सफाई कामगारांसोबत असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.