केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीनही कायदे रद्द करावे अन्यथा गोंडवाना गणतंत्र पार्टी गली पासून दिल्ली पर्यंत आंदोलन उभारेल पांडुरंग जाधव*

89

 

(फारुख शेख)
जिवती : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हा हे 8-02-2021 रोजी जिवती येथे आंदोलनाच्या माध्यमातून कृषी कायदे रद्द करणे व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. पांडुरंग जाधव अध्यक्ष राजुरा विधानसभा कोर कमिटी, गजानन जुमनाके अध्यक्ष राजुरा विधानसभा गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या नेतृत्वखाली हा मोर्चा काढण्यात आला मा.तहसिलदार जिवती, यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना गोंडवाना गणतंत्र पार्टीचे,विविध इसंघटनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील 70 टक्के जनता कृषी व्यवस्थेवर आधारित आहे. देशातील शेतकरी आधीच कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे करून शेतकऱ्यांना मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे. यासाठी देशातील शेतकऱ्यांनी दिल्ली या देशाच्या राजधारीत आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाच्या समर्थन देण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हा हे समर्थन देत असून आज 8-02-2021 रोजी जिवती येथे आंदोलनाच्या माध्यमातून कृषी कायदे रद्द करणे व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
*निवेदनातील मागण्या खालीलप्रमाणे:-*
1) केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करणे:- केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे केल्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन करून शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करीत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असून त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आज दि. 8/02/2021 ला जिवती तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करीत असून केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करावे अशी आमची मागणी आहे.
*2) जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे मिळणे:-* चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा तालुका पहाडी, दुर्गम व वनक्षेत्र व्याप्त आहे. या तालुक्यातील शेतकरी अनेक पिढ्यापासून वन जमिनीवर कास्त करून आपली उपजीविका करीत आहे. मात्र शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे न मिळाल्याने शेतकरी शासनाच्या योजने पासून वंचित आहे. वन जमिनीवरील कास्त असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात यावे.
*3) जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना रोहयो कामे उपलब्ध करून देणे.:-* जिवती तालुक्यातील शेतकरी शेतमजूर हे शेतीवर अवलंबून आहे. सन 2020-21 हंगामात बोंडअळी व इतर किडीमुळे शेतीच अतोनात नुकसान झाल्याने शेती तोट्यात आली व शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शेती शिवाय या तालुक्यात रोजगाराचे इतर साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे तालुक्यात रोहयो ची कामे सूरु करून शेतकरी शेत मजुरांना रोहयो अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
*4) कसेल त्याची जमीन नुसार जबरानजोत शेतकऱ्यांना स्थायी पट्टे देणे:-* अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. गेल्या 3 – 4 दशकापासून शेती करून या शेतकऱ्यांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळाले नाही. कसेल त्याची जमीन या कायद्यानुसार जबरानजोत शेतकऱ्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे.
*5) महाराष्ट्र सरकारने मा.उच्च न्यायालयातील वन विभागाच्या बाजूने झालेल्या निर्णयाविरोधात मा.उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता याचिका (पिटीशन) दाखल करणे:-* जिवती तालुक्यातील सर्वच जमीन ही वन विभागाची आहे. असा निकाल मा.उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच विकास कामे वन कायदाच्या अडचणी मुळे प्रभावित झाली असून, तालुक्याचा विकास खुंटला आहे. कोणतेही विकास कामे करण्यास वनविभागाची आडकाठी येत असल्याने मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात पिटीशन दाखल करून उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती मिळवावी.
*6) जिवती तालुक्यातील साडेबारा गावांवर तेलंगणा राज्य सरकार हक्क सांगत असून ती गावे महाराष्ट्रात ठेवणे व या गावांचा विकास करणे शासनाचे लक्ष घालून प्रयत्न मार्गी लावणे:-* महाराष्ट्रातील साडेबारा गावांवर तेलंगणा राज्य सरकार हक्क सांगत आहे. सदर गावे ही महाराष्ट्राचे हद्दीत असून येथे मराठी भाषित लोक वास्तव्यास आहे. न्यायालयीन निवाड्यानुसार ही गावे महाराष्ट्रात असल्याचे सिद्ध होऊनही तेलंगणा राज्य सरकार आपला दावा सोडायास तयार नाही. येथे वास्तव्यास असलेली जनता ही महाराष्ट्रात राहण्यास तयार असून या साठी राज्य शासनाचे लक्ष घालून या गावात विकास कामे करावी व महाराष्ट्रात ठेवण्या संबंधात केंद्र कडे पाठपुरावा करावा.
*7) सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे:-* जिवती तालुक्यात कोणतेही उद्योग धंदे नाहीत. येथील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी परराज्यात व राज्यातील मोठ्या शहरात जावे लागते. लॉकडाऊनच्या काळात अनेक सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार गेल्याने ते बेरोजगार आहे. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथे सिमेंट कंपन्या, कोळसा खाणी, स्टील प्लॅन्ट, वीज निर्मिती केंद्र असल्याने स्थानिक उद्योगात या स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
*8) जिवती तालुक्यातील मोठे बंद असलेल्या तलावाची कामे जलद गतीने सुरू करणे:-* जिवती तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी आपले हमखास उत्पादन घेऊ शकत नाही. जिवती तालुक्यात अनेक मोठ्या तलावाची निर्मिती करण्याचे प्रास्ताविक आहे. काही तलावाची कामे सूरु होऊन अर्धवट स्थितीत असल्याने शेतीत पाणी उपलब्ध होत नाही व सिंचना अभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने तालुक्यातील बंद असलेल्या तलावाची कामे तातडीने सुरू करण्यात यावे.
*9) कोविड19 च्या लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिल माफ करणे;-* कोविड19 च्या लॉक डाऊन काळात जनतेचा रोजगार गेल्याने अनेकांनी वीज बिल भरले नाही. अशात सरकारने वीज बिल भरण्यास सवलत देण्याच आश्वासन दिल्यानेअनेकांनी बिलचा भरणा केला नाही व आता वीज मंडळ कडून बिल भरण्याचा तगादा लावला जात आहे व वीज कनेक्शन कापण्याच्या नोटिसा दिल्या जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात शासना विरोधात राळे निर्माण होत आहे व जनता वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शासनाचे थकीत वीज बिल माफ करावे.
वरील सर्व मागण्या या जनतेच्या रास्त मागण्या असून त्या तातडीने सोडवाव्या ही विनंती.!!
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीने आज पिवळा झेंडा हाती घेऊन रॅली काढून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.शेतकरी विरोधातील काळे कायदे तात्काळ रद्द करा अशी मागणी देखील यावेळी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी देशभरातील शेतकरी आहे जोपर्यंत काळे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील केंद्रसरकारने आतातरी शेतकऱ्याच्या हिताच्या बाजूने निर्णय घेत काळे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टी ने आज हजारो शेतकरी रॅली मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी केली जीवती शहरातील स्व.गोदरू पाटील जुमनाके यांचा निवासस्थानी पासून ते बसस्टप रामराव महाराज चौक, शेडमाके चौकातून सुरू झालेली पिवळा झेंडे घरून रॅली थेट तहसील कार्यालय परिसरात धडकली तहसीलदार यांना निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.
यावेळी उपस्थित बापूराव मडावी जिल्हाध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर, पांडुरंग जाधव अध्यक्ष कोर कमिटी गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा, गजानन गोदरू पाटील जुमनाके अध्यक्ष, राजुरा विधानसभा तथा नगरसेवक जिवती, निशिकांत सोनकांबळे,सतलुबाई गोदरूजी जुमनाके, ममताजी जाधव, मेहबुब शेख, जमीर अब्दुल हमीद जिल्हा उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, भीमराव जुमनाके, हनुमंतुजी कुमरे, वाघूजी उईके, फारुख शेख अध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख राजुरा विधानसभा, मुनिर मकबूल सय्यद अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, संजय सोयाम, कुमरे मेजर, दीपक पेंदोर, प्रदीप कुलमेथे, प्रा.लक्ष्मण मंगाम, या कार्यक्रमाचा प्रस्ताविक : कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ चंद्रपूर, सूत्रसंचालन : निशिकांत सोनकांबळे. आभारप्रदर्शन : प्रा.लक्ष्मण मंगाम यांनी केली आहे.