पंचायत राज समितीचे सदस्य आ. किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या भेटीला*

0
206

Chandrapur

कष्ट करून जगण्याचा संदेश देत स्वताही त्याचा अवलंब करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई यांची पंचायत राज समितीच्या सदस्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी सर्व सदस्यांना संविधान पुस्तक भेट स्वरूप देण्यात आले
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या 75 वर्षीय मातोश्री गंगूबाई या आजही गांधी चौकातील सात मजली इमारती खालील फुटपाथवर बसून टोपल्या विकण्याचे काम करत आहे. सामाजिक, राजकीय किव्हा पारिवारिक जीवनात जगत असतांना कष्टाला विशेष महत्व दिले पाहिजे. कष्ट हेच यशाचे मूलमंत्र असल्याचा संदेश देत त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहे. त्यांच्या याच कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली असून त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान पंचायत राज समितीचे सदस्य चंद्रपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी आज आ. किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत त्यांच्या मातोश्री गंगुबाई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गंगुबाई यांच्याशी चर्चा केली. प्रवास खरतळ असला तरी कष्टाच्या बाळावर त्यातून यशस्वी वाटचाल करता येऊ शकते असे यावेळी गंगुबाई म्हणल्यात. याप्रसंगी भेटीला आलेल्या सर्व सदस्यांना संविधानाचे पुस्तक भेट स्वरूप देण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर, आमदार विक्रम काळे, आमदार अनिल पाटील, आमदार अंबादास दानवे, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजभे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वखर्डे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here