अवैध बांबु ताटवे वनोपज वाहून नेणारा मेटॉडोर जप्त

0
209

 

बल्लारशाह : दिनांक 10/02/2021 रोजी मेटॉडोर क्र . MH – 34 M – 2404 मध्ये इटोली गिलबिली या मार्गावर अवैधरित्या सरकारी वनातुन बांबु कापुन त्यापासुन ताटवे तयार करुन वाहतुक करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे महेंद्र नामदेव राखुंडे रा . अजयपुर यांना श्री . प्रविण विरुटकर , क्षेत्र सहाय्यक मानोरा , वनरक्षक श्री . प्रविण बिपटे , क्षेत्र सहाय्यक उमरी यांनी सापळा रचुन नमुद मेटॉडोरसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहनात 140 नग ताटवे विनापरवाना वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले . त्यावरुन वाहन व वनोपज जप्त करुन आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे रा , अजयपुर यांचे विरुदध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 ( 1 ) ब अन्वये , महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम क्रमांक 41 अन्वये नुसार वनगुन्हा क्रमांक -76/11 दिनांक 10/02/2021 नोंद करण्यात आला . सदर वनगुन्हयाचा तपास संतोष थिपे , वनपरिक्षेत्र अधिकारी , यांचे मार्गदर्शनात श्री . प्रविण विरुटकर , क्षेत्र सहाय्यक , मानोरा करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here