विट्ठल मंदिर योग केंद्र वर्धापन दिन सोहळा संपन्न

0
279

Chandrapur

विठ्ठल मंदिरदे वस्थान पतंजली योग केंद्राचे वर्धापन दिन सोहळा दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने योग शिक्षिका अल्का अविनाश जिझिलवार यांचे मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पतंजली योग केंद्राचे प्रांत संघटन मंत्री विमल कांसटीया या निमित्ताने आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले आज योगाच्या बाबतीत बोलणे म्हणजे सुर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे. तळागाळातील व्यक्तिपर्यंत याचा प्रसार-प्रचार झाला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात जेव्हा औषधी किंवा लस उपलब्ध नव्हती अश्या आपत्कालीन वेळात भारतीय चिकित्सा पद्धती योग आणि आयुर्वेद तत्व सर्वसामान्यांना परवडणारा उपाय होता. अनेक योगयोद्धे कोरोनायोद्धे सिद्ध झालेत. मुख्य योग शिक्षक मोहन मसराम प्रमुख पाहुणे होते ते म्हणाले की योग शिक्षिका अल्का अविना जिझिलवार, अश्विनी रामेडवार, विमल काटकर तसेच सर्व महिला व पुरुष योग वर्गाच्या सहकार्याचे कौतूक केले. घराघरांत जाऊन मानव समाजाला योगविषयी चेतना निर्माण केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरोग्य हे हसत खेळत योग करून आध्यात्माकडे, शरीराबरोबरच मन बळकट करण्यात योगाचे महत्त्व, योगाने सुप्त शक्तीचे जागरण, बालकांपासून ते वृद्धांपर्यंत योग कसे काय सृजनात्मक आहे हे सांगितले. योग शिक्षिका, कार्यक्रमाच्या आयोजिका तसेच कार्यक्रमाच्या संचालनकर्त्यां अल्का अविनाश जिझिलवार यांनी समाज सशक्त करायचा असेल तर योगवर्गात महिलांबरोबर पुरुष, समाजाचे दोन अंग महत्त्वाचे असून पुरुषांचीही संख्या दिवसेंदिवस योगवर्गात वाढते आहे. तरी जास्तीत जास्त. घटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात माजी नगरसेवक दिलीप रामेडवार यांनी योग वर्गाकरिता कोणतीही मदत करण्यास ते स्वतः व नगरसेविका सीमाताई  रामेडवार प्रतिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमात, शिवतांडव, योगनृत्य, भारतीय महान स्त्रीया यांचेवर नाटिका सादर करून मोठ्या सख्येत उपस्थित असलेल्या श्रोत्यांमध्ये समाज जागृतीचे दर्शन घडवून आणण्यात आले. कार्यक्रमात ज्योती मसराम, स्मिता रेभनकर, रमेश कासुलकर, सहयोग शिक्षिका अश्विनी रामेडवार, विमल काटकर तसेच सर्वच योग मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.chandrapur varta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here