वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मोर्चा*

0
82

*वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्या या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मोर्चा*

वेकोलीत स्थानिक युवकांना रोजगार द्या या मागणीकरीता सोमवारी १५ फेब्रुवारीला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यासह हजारो युवक सहभागी होणार आहे.
चंद्रपूरात सर्वत्र वेकोलीची जाळे पसरले आहे. याचा मोठा दुष्यपरिणामही प्रदुषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिल्या जात नाही. परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे वेकोली अंतर्गत चालणा-या विविध कंपण्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या मोर्चाला गांधी चौकाजवळून सुरुवात होणार आहे. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकरणा आहे. या मोर्चात जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येत नागरिक सहभागी होणार आहे. या मोर्चा साठी मागील पंधरा दिवसापासून विविध ठिकाणी बैठका घेत जनजागृतीही करण्यात आली आहे. मोर्चात बेरोजगारींच्या संकटामूळे ओढावलेल्या संकटावर आधारीत झाकीचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. या मोर्चात बेरोजगार यूवक व चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here