पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शरद पवार विचार मंच तसेच बालाजी वॉर्ड मित्र परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

0
154

Chandrapur

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शरद पवार विचार मंच तसेच बालाजी वॉर्ड मित्र परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज या दुःखद घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली असून अजूनही स्पोटक कशी आली त्याचा सुगावा लागलेला नाही . दहशतवाद्यांच्या ।भ्याड हल्ल्यात आपल्या जवानांना वीरमरण आले .आज त्यांच्या स्मरणार्थ बालाजी वॉर्ड इथे वृक्षारोपण करून तसेच अनावश्यक केरकचरा स्वच्छ करून विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. जेणेकरून त्यांचे बलिदान वॉर्डातील नागरिकांच्या नेहमी स्मरणार्थ राहील. यावेळी शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर ,ज्येष्ठ नागरिक विजयजी बोडणे शेषरावजी गौरकार, अशोकराव खिरडकर मंगेश बोडके ,नयन कांबळे नयन क्षीरसागर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here