चंद्रपूर जिल्यात 24 तासात चार पॉझिटिव्ह

0
143

 

चंद्रपूर, दि. 15 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात केवळ चार नवीन कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 23 हजार 238 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 738 आहे.
सध्या 107 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख सहा हजार 740 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 81 हजार 822 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 393 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 355, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या चार रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील दोन व चंद्रपूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here