शुभम फुटाणे हत्या प्रकरण : ड्रीम लैंड परिसरात फेकलेला मोबाईल हस्तगत

307

ड्रीम लैंड सिटी परिसरात फेकलेला मोबाईल हस्तगत
• पोलिस अधिक्षक यांची घुग्घूस पोलिस स्टेशनला भेट
• शुभम फुटाणे हत्या प्रकरण

चंद्रपूर प्रतिनिधरी : 15 फेब्रुवारी 2021
घुग्घूस येथील इंजिनियरींग चा विद्यार्थी शुभम फुटाणे हत्या प्रकरणात आज सोमवारी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे नेतृत्वात डॉग स्कॉट आणि बिडीएस स्कॉटने केलेल्या तपासात घटनास्थळावर पोलिसांना मोबाईल मिळाला आहे. सदर मोबाईल हा मृत शुभम यांचा आहे. ज्या दिवशी शुभमचे अपहरण करण्यात आले होते. त्या दिवशी आरोपी गणेश पिंपळशेंडे यांने त्याच मोबाईल व्यन त्याच्या आईवडीलांना फोन करून खंडणीची मागणी केली होती. त्यांनतर त्या मोबाईल वरून संपर्क तुटला.
काल आरोपीची चार दिवसाची पोलिस कोठडी घुग्घूस पोलिसांनी घेतल्या नंतर आज जलदगतीने तपास करण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सर्वप्रथम घुग्घूस पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यांनतर डॉग स्कॉट आणि बिडीएस स्कॉटच्या तपासावरून् ड्रीम लैंड सिटी मध्ये लोकेशन ट्रॅक करण्यात आले. या शेतातील एका खड्यात मोबाईल हस्तगत करून ताब्यात घेण्यात आलेला आहे. आजच्या या घटनेवरून याच आसपास परिसरात शुभमची हत्या करण्यात आली असावी अशी ही शंका पोलिसांनी वर्तविली आहे.