कामगारांना पुर्ववत कामावर घेण्यात यावे : यंग चांदा ब्रिगेडची

0
112

वन अकादमी येथील सफाई कामगारांना पुर्ववत कामावर घेण्यात यावे, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

मनपा आयुक्तांना निवेदन

कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या वन अकादमी येथील सफाई कामगारांना पुर्ववत कामावर रुजु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक राहूल मोहुर्ले, जितेश कुळमेथे, बादल हजारे, सचिन चिवंडे आदिंची उपस्थिती होती.
मध्यंतरी चंद्रपूरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या वन अकदामी येथे व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील साफसफाई करण्यासाठी येथे सफाई कमागारांची नियुक्ती करण्यात आली होती. आता चंद्रपूरात जवळपास कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. त्यामूळे वन अकादमी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी येथील सफाई कामगारांनाही कामावरुन काढण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पाँझिटिव्ह रुग्णांच्या उपचार सुरु असलेल्या ईमारतीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणा-या या कामगारांना असे बेरोजगार करणे हा अन्याय आहे. त्यामूळे या कामगारांना महानगरपालिकेच्या अधिनस्त येत असलेल्या इतर कोणत्याही आस्थापनेत या कामगारांना काम देण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कोविड -१९ च्या रुग्णांवर वन अकादमी येथे उपचार केल्या जात आहे. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होताच येथील सफाई कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here