मराठी राजभाषा दिनानिमीत्‍त कलासाधक सन्‍मान प्रदान सोहळयाचे आयोजन

0
73

मराठी राजभाषा दिनानिमीत्‍त कलासाधक सन्‍मान प्रदान सोहळयाचे आयोजन

आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेचा उपक्रम.

ज्‍येष्‍ठ गायिका सुरेखा दुधलकर कलासाधक सन्‍मानाच्‍या मानकरी.

 

 

दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन तसेच कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रजांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेतर्फे कलासाधक सन्‍मान प्रदान सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतिक सभागृहात सायं. 7.00 वा. आयोजित या सोहळयात चंद्रपूरातील ज्‍येष्‍ठ गायिका व संगीत शिक्षीका सुरेखा दुधलकर यांना कलासाधक हा सन्‍मान प्रदान करण्‍यात येणार आहे.

 

श्रीमती सुरेखा दुधलकर हया गेली अनेक वर्षे संगीत साधना करीत आहे. स्‍वरविहार संगीत विद्यालयाच्‍या त्‍या संचालक आहे. त्‍यांच्‍या तालमीत अनेक गायक तयार झाले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेचे स्‍थायी समिती सभापती श्री. रवि आसवानी तसेच सरदार पटेल महाविद्यालयाच्‍या मराठीच्‍या प्राध्‍यापक, सुप्रसिध्‍द कवयित्री डॉ. प्रा. पद्मरेखा धनकर यांच्‍या उपस्थितीत श्रीमती सुरेखा दुधलकर यांना कलासाधक सन्‍मान प्रदान करण्‍यात येणार आहे. या सोहळयानंतर आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेतर्फे योगेश सोमण लिखीत डॉ. जयश्री कापसे-गावंडे दिग्‍दर्शीत ‘दृष्‍टी’ ही एकांकिका सादर करण्‍यात येणार आहे. या एकांकिकेत हिमांशू जोशी आणि बकुळ धवने यांच्‍या प्रमुख भूमीका आहेत.

 

मराठी राजभाषा दिनानिमीत्‍त आयोजित या कलासाधक सन्‍मान प्रदान सोहळयाला चंद्रपूरकर रसिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेतर्फे डॉ. जयश्री कापसे-गावंडे, अजय धवने, आशिष अम्‍बाडे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here