पूजा चव्‍हाण आत्‍महत्‍येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेत सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करा

0
86

 

चंद्रपूर

पूजा चव्‍हाण नामक एका युवतीला आत्‍महत्‍येसाठी प्रवृत्‍त करण्‍याच्‍या प्रकरणी राज्‍याचे वनमंत्री श्री. संजय राठोड यांचा राजीनामा घेवून त्‍यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या मागणीसंदर्भात भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर शाखेच्‍या अध्‍यक्षा माजी महापौर सौ. अंजली घोटेकर यांच्‍या नेतृत्‍वात महिलांच्‍या एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने व उप पोलिस अधिक्षक शेखर देशमुख यांना निवेदन सादर केले.

पूजा चव्‍हाणच्‍या आत्‍महत्‍येप्रकरणी ज्‍या अकरा ऑडीया क्लिप्‍स समाज माध्‍यमांवर व्‍हायरल झाल्‍या आहेत त्‍यात राज्‍याचे वनमंत्री संजय राठोड, त्‍यांचे कार्यकर्ते अरूण राठोड व विलास चव्‍हाण यांचे आवाज आहेत हे स्‍पष्‍ट आहे. यवतमाळच्‍या शासकीय रूग्‍णालयात पूजाला उपचारार्थ दाखल करून तिचा गर्भपात करण्‍यास भाग पाडल्‍याचे याप्रकरणी दिसुन येते. पूजाचा मोबाईल ताब्‍यात घे अशा सूचना या ऑडीओ क्‍लीप्‍समध्‍ये देण्‍यात आले आहेत. याप्रकरणाची निःष्‍पक्षपणे चौकशी होण्‍यासाठी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणे व त्‍यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करणे आवश्‍यक असल्‍याचे सौ. अंजली घोटेकर यांनी निवेदनात म्‍हटले आहे. शिष्‍टमंडळाच्‍या भावना शासनदरबारी कळविण्‍यात येईल, असे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी व उपपोलिस अधिक्षक यांनी शिष्‍टमंडळाला दिले. या शिष्‍टमंडळात भाजपा महिला मोर्चा महामंत्री सौ. शिला चव्‍हाण, सौ. प्रज्ञा गंधेवार, सौ. सपना नामपल्‍लीवार, उपाध्‍यक्षा सौ. प्रभा गुडधे, मंजूश्री कासनगोट्टूवार, लिलावती रविदास, कविता जाधव, शुभांगी दिकोंडवार, श्रीमती शोभा पारिख यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here