*बेरोजगारांना न्याय मिळण्याआधीचं मनसे नेता अंडरग्राउंड*

0
302

चंद्रपूर – वेकोली भटाळी क्षेत्रात कार्यरत खाजगी GRN कन्स्ट्रक्शन कंपनीत 17 फेब्रुवारीला मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी खळखळखट्याक आंदोलन केले.
स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ते GRN कंपनीला निवेदनाद्वारे मागणी करीत होते मात्र कंपनीने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रोडे यांनी अक्षरशः त्या कंपनीवर कार्यकर्त्यांसह धावा बोलत तोडफोड केली.
मशीन, ट्रक, चारचाकी वाहन, टीव्ही, एसी अश्या अनेक वस्तूंची तोडफोड त्यांनी करीत GRN कम्पणीच्या कार्यालयात धुमाकूळ घातला.
मात्र आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनदीप रोडे यांनी बेरोजगारांना सोडून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे आपल्या ताफ्यासह पोहचले.
घटनेचा पंचनामा करीत पोलिसांनी मनदीप रोडे वर कलम 395 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
स्थानिकांना रोजगार द्या अन्यथा कंपनी चालू देणार नाही असा खंबीर इशारा देणारे व बेरोजगारांच्या मागण्यासाठी लढणारे मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे आंदोलन संपल्यावर पसार का झाले हे अजूनही अस्पष्ट आहे. यासंदर्भात मनदीप रोडे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचा नंबर स्विच ऑफ होता.
संघटना असो की पक्ष नेतृत्व करणारा हा पीडितांच्या सोबत असतो परंतु असे पहिल्यांदाच घडले की नेतृत्व करणारा आंदोलन झाल्यावर बेरोजगारांना त्या ठिकाणी सोडून पसार झाला.
पोलिसांनी या प्रकरणात 7 जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here