युवकांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा विचारांचा आदर्श घ्यावा :- मेजर बंडूजी कुमरे

0
111

 

वणी :- समाजातील युवकांनी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, अतिशय कमी वयात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी लढाई लढली, आजच्या युवकांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे आदर्श घेऊन मोठी स्वप्न बघावी ती पूर्ण होत पर्यंत कठोर मेहनत घ्यावी असे प्रतिपादन मेजर बंडूजी कुमरे यांनी केले.

ते वणी तालुक्यातील मोहदा येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आणि सल्लेगागरा चिन्हाच्या उदघाटन सोहळ्यात उदघाटननिय भाषणात बोलत होते. या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष भाऊ आत्राम, प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते संजयजी सोयाम, शालिक पंधरे, विजय आडे, नथ्थू आडे, शशिकला आत्राम, ज्ञानेश्वर येसेकार चंदू देठे, हरिदास चौधरी, मंगेश ठावरी, अरुण सोयाम, वासुदेव टेकाम, राहुल पावडे, नामदेव चौधरी, रवींद्र बोथले, हरिदासजी केळझरकर, संतोषजी कुमरे व मोहदा येथील ग्रामवासिय आणि मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here