जात पडताळणीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढा : भाजप

0
78

नागरिकांच्या जात पडताळणीची अनेक प्रकरणे  प्रलंबित आहेत.त्यामुळे त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.ही प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी या मागणीला घेऊन महानगर भाजपाने आज बुधवार (17 फेब्रुवारी)ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. भाजपा जिल्हाध्यक्ष(श) डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात महापौर राखीताई कंचर्लावार,स्थायी समिती रवी आसवानी,भाजपा महामंत्री व नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, आदिवासी मोर्चा महामंत्री शुभम गेडाम, यशवंत सिडाम,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री किशोर आत्राम, अरविंद मडावी,शशिकांत मस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना डॉ गुलवाडे म्हणाले,चंद्रपुर जात पडताळणी समितीकडे जिल्ह्यातील किमान 4700 प्रकरणे प्रलंबित आहेत.यात ग्रामपंचायत स्तरावरील 3300 तर 1700 प्रकरणे विद्यार्थ्याची आहेत.शासनाने ऑनलाइन प्रक्रिया केल्याने,माहिती प्रमाणे समितीवर दुहेरी कामकाजाचा बोजा वाढला आहे.त्यामुळे विलंब पण होत आहे.ही बाब नागरिकांचा मनस्ताप वाढविणारी  आहे.समस्या सोडविण्यासाठी शासनातर्फे समितीचा स्वतंत्र पदभार असणारा अध्यक्ष नेमण्यात आला, पण अजून पर्यंत त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नुकत्याच, आपल्या कडील ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या,या सोबतच इयत्ता 10 वि व 12 वि च्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत.अश्यात जातपडताळणीसाठी दिरंगाई होत असेल तर,प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे सांगून  डॉ गुलवाडे यांनी महानगर भाजपाच्या वतीने,
जिल्हाप्रशासनाने विषयाचे गांभीर्य ओळखून आवश्यक ते पाऊल उचलावे व नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी केली.प्रशासनाने दिरंगाई केल्यास भारतीय जनता पार्टी,महानगर चंद्रपूरला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा गर्भित इशारा शिष्ठमंडळाने दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here