महिलांचा आदर, सुरक्षा असलेलं स्वराज्य आपल्या विचारातून निर्माण करायची गरज – सुनीता गायकवाड

123

 

चंद्रपूर – ‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा गेल्या काही वर्षांपासून रुजलेला नारा यंदा कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. करोनाचे वाढते संक्रमण पाहता शिव मावळ्यांनी आपापल्या घरात  शिव जयंती साजरी करावी. तसेच शहरात होणाऱ्या विविध सार्वजनिक उपक्रमांना हजेरी लावताना सुरक्षित वावर जोपासण्याची काळजी घेण्याचे आवाहन विविध संघटनांद्वारे करण्यात आले होते.

यंदा करोनामुळे शिवजयंतीच्या जल्लोषावर बंधने आली आहेत. सरकारनेही यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. ती पाळायची की नाही, हा वाद कायम असला तरी सार्वजनिकस्थळी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन सर्व आयोजकांकडून करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने सुद्धा रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वीर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
सुनीता गायकवाड यांनी उपस्थित महिला मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश एकच आहे शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत, महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे महिलांचा आदर, सुरक्षा व्हायची आता तेच राज्य आपल्याला स्वतःच्या विचाराने पूर्ण करायचे आहे.
आयोजित कार्यक्रमात मनसे महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके, उपाध्यक्ष वाणी सादलावार, विना बोरकर, वर्षा भोमले, दर्शना वल्लरवार, शीतल उत्तरवार, स्मिता डोनेवार आदींची उपस्थिती होती.