यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
86

        छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामूख्यतेने उपिस्थती होती. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर प्रमूख वंदना हातगावकर, कामगार युनियन नेते विश्वजीत शाहा, शिक्षण विभाग प्रमूख प्रतिक शिवणकर, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, हरमन जोसेफ, राहूल मोहुर्ले, नितीन शाहा, आनंद रणशूर, वैशाली काटकर, दुर्गा वैरागडे, सुजाता बल्ली, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुर गाथा आजही समाजाला प्रेरणा देत आहे. रयते प्रती असलेल त्यांच प्रेम जगजाहीर आहे. त्यामूळे त्यांच्या कार्यकाळातील राजवटीला रयतेचे राज्य म्हटल्या जाते असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. याप्रसंगी वंदना हातगावकर, जितेश कुळमेथे यांनीही मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here