आरोप : नगरसेवकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा

0
545

 

ती मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. तिने दुसऱ्या व्यक्तीला घर विकले आहे. ती एका मिनिटासाठी माझ्या घरी आली. माझी पत्नीही घरीच होती. तू घर विकले आहे, असे म्हणताच, तुम्हीही त्याच्यासोबत मिळून असल्याचा समज केला. तिने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. तिची आणि माझी नार्को टेस्ट करावी, मी दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेणार.

संदीप आवारी नगरसेवक मनपा, चंद्रपूर

चंद्रपूरः- घरावर अतिक्रमण करण्यात येत असल्याने, भाजप नगरसेवकांकडे मदत मागण्यासाठी गेले असता, भाजप नगरसेवक तथा मनपा गटनेता संदीप आवारी यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने शनिवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असाही आरोप संबंधित महिलेने यावेळी केला.

सरकारनगर पाण्याच्या टाकीजवळ दलविंदर कौर सेवासिंग पटवालिया यांचे वडिलोपार्जित घर आहे. दलविंदरच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना वारसा हक्काने घर मिळाले. त्या घरी एकट्याच राहतात. याचाच फायदा घेत, त्यांच्या भाऊ दलजीत सिंग याने गंगाधर वानखेडे, वंदना वानखेडे याच्यासोबत १५ फेब्रुवारीला जबरदस्ती घरी घुसून अतिक्रमण केले, तसेच घराची एक भिंत पाडली.

याबाबत मदत मागण्यासाठी भाजप नगसेवक संदीप आवारी यांच्याकडे गेल्या असता, त्यांनी शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप करीत याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दलविंदर कौर सेवासिंग पटवालिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here