म. रा. मा. परिवहन महामंडळ चंद्रपुर आगारात मार्ग सुरक्षितता मोहीमेचा समारोप

0
103

चंद्रपुर :- चंद्रपुर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपुर आगारात दिनांक 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत सुरक्षितता मोहीम राबवण्यात आली होती. या दरम्यान जाणार चालक -वाहक -यांत्रिक कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात करण्यात आले .
या समारोप कार्यक्रमाची प्रामुख्याने डोंगरकर ,सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांनी अध्यक्षता केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश सोलापन ,महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष , कु प्रिया कोल्हे वाहतूक निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने डोंगरकार म्हणाले की, एक महिन्यापर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा चंद्रपुर आगारात मार्ग सुरक्षितता मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला ,तो अपघात कमी करण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे . तसेच राजेश सोलापन यांनी सुरक्षितता कार्यक्रमाचे नियमांचे पालन नेहमी केल्यास लाभप्रद ठरू शकेल .त्या दृष्टीने आगारात प्रयत्न करण्याच्या मुद्यांवर त्यांनी भर दिला. यावेळी मंचावर प्रामुख्याने डोंगरकर, राजेश सोलापन, कु प्रिया कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व अभार प्रदर्शन किरण नागापुरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here