डेरा आंदोलनाने प्रभावित होऊन मुंबईत स्थिरावलेले उच्चशिक्षित व्यावसायिक भूषण फुसे यांचा स्वगावी जनविकास सेनेत प्रवेश..

0
163

Chandrapur

मूळचे चंद्रपूर शहरातील रहिवासी व सध्या नवी मुंबई येथे व्यवसायानिमित्त स्थिरावलेले भुषण फुसे यांनी चंद्रपूरात आपल्या मुळ गावी सार्वजनिक कार्यामध्ये योगदान देण्याच्या हेतुने जनविकास सेनेमध्ये प्रवेश घेतला. सिव्हिल इंजिनीअरिंग व एम.बी.ए. ची पदवी घेतलेले फुसे यांनी शिक्षणाच्या निमित्ताने १९९७ मध्ये चंद्रपूर सोडले होते. अमरावतीला इंजिनियर ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली येथुन एम.बी.ए. केले व २०१२ पासून मुंबई येथे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नवी मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट व ऑफीस सुध्दा घेतले. सामाजिक बांधिलकी जपण्याचे हेतुने चंद्रपूरमध्ये मुळ गावी येऊन काहीतरी करण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच नगरसेवक पप्पू देशमुख यांनी वडगाव प्रभागांमध्ये कोरोना काळात लहान मुलांसाठी सुरू केलेली झिरो काॅन्टॅक्ट मोहल्ला स्कुल, पोलिस भर्तीपूर्व प्रशिक्षण शिबिर व ५०० कोविड योध्द्यांच्या थकीत पगारासाठी पुकारलेले डेरा आंदोलन या सर्व उपक्रमांनी प्रभावित होऊन फुसे यांनी जनविकास सेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. डेरा आंदोलनाच्‍या मंडपामध्ये जन विकास कामगार संघाचे शेकडो कामगारांच्या उपस्थितीत त्यांनी जन विकास सेनेत रितसर प्रवेश घेतला. यावेळी जनविकास सेनेचे पदाधिकारी घनश्याम येरगुडे, राहुल दडमल, किशोर महाजन, इमदाद शेख, नामदेव पिपरे, आकाश लोडे, गीतेश शेंडे, प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, मनिषाताई बोबडे, कांचन चिंचेकर, ज्योतीताई कांबळे, प्रफुल बजाईत, प्रमोद मांगरुळकर, रुपेश पिट्टलवार, शेवंता भालेराव, नीलिमा वनकर, गीता दहीवलकर इत्यादींनी
पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व आंदोलकांना मिठाईचे डबे वाटप करण्यात आले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here