अमरावती मध्ये सात दिवसाचा lokdoun- बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर

0
279

अमरावती –

अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकाऱ्यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल.

अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

“स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही करायचं ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल”, असं त्यांनी सांगितलं.

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here