यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घंटागाडी कामगारांना सुरक्षा साधने व आरोग्य किटचे वाटप

0
93
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घंटागाडी कामगारांना सुरक्षा साधने व आरोग्य किटचे वाटप

पंचतेली समाज हनुमान मंदिर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने झोन क्रं 1 येथील घंटागाडी कामगारांना सुरक्षा साधने व आरोग्य किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या किटचे वाटप घंटागाडी सफाई कामागरांना करण्यात आले.  याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे बादल हजारे, वंदना हजारे,  महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, वैशाली मेश्राम, सविता दंडारे, प्रतिक हजारे कोंडबाजी मून आदि मान्यवरांची प्रामुख्यतेने उपस्थिती होती.
कोरोनासारख्या महाभंयकर संकटातही घंटागाडी कामगार सेवा देत चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या सेवा करणा-या कामगारांचा कोविड योध्दा म्हणूनही सत्कार करण्यात आला आहे. दरम्याण आज जटपूरा गेट जवळील पंचतेली समाज हनुमान मंदिर येथे झोन क्रं 1 येथील घंटागाडी कामगारांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरक्षा साधने व आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात काम करत असतांना या कामगारांचे आरोग्य सुदृढ राहावे हा या मागचा प्रमूख उद्देश होता. घंटागाडी कामगारांच्या प्रश्नासांठी यंग चांदा ब्रिगेड वेळोवेळी लढा उभारत आहे. त्यांच्या न्यायक मागण्यांसाठी आंदोलनेही करण्यात आली आहे. या कामगारांची सेवा लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी ही किट देण्यात आली असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलतांना यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगावर यांनी केले. या कार्यक्रमाला झोन क्रं. 1 मधील घंटागाडी कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here