दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कुलची अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाईन घ्या : पालकांची मागणी

300

 

बल्लारपूर-अक्षय भोयर (ता,प्र)
बल्लारपूर शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कुल कोरोनाच्या संक्रमण काळातही शाळेने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले मात्र सद्यस्थितीत राज्यभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतांना बल्लारपूर शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे.
अश्या परिस्तितीत विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला वर्ग 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्याची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याची मागणी केली होती. परंतु
व्यवस्थापन पालकांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून येते आहे. पंचायत समितीचे 6 अधिकारी वर्ग व गटशिक्षण अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे वृत्त आहे.
अंतिम सत्राची परीक्षा कोरोनाचे गांभीर्या लक्षात घेऊन ऑनलाईन स्वरूपात घेण्याची मागणी पालक वर्गानी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून,आपली मागणी केली . व तालुका स्तरावर मा.तहसीलदार बल्लारपूर, मा.मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर व मा.गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांना सुध्दा यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. बल्लारपूर तहसीलचे तहसीलदार साहेब यांनी खुद्द शाळा प्रशासनाची भेट घेऊन या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी असे नोटीस शाळेला दिले परंतु शाळा प्रशासनाने अद्याप देकील या निर्णयाचा विचार सुद्धा केला नाही दिनांक २७/२/२०२१ पासून होऊ घातलेल्या या परीक्षा काही पालक होऊ देणार नाही असा काही पालकांनि चंग बांधला आहे . आता शाळा प्रशासन या मागणीला कसा प्रतिसात देतील या कळे सर्वांचे लक्ष लागून आहे