कृषी विज्ञान केंद्रातर्फे हरभरा पीक शेतीदिनाचे आयोजन

0
126

चंद्रपूर दि.२७, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत रब्बी हगांमाकरिता हरभरा या पिकाचे प्रात्यक्षिक चंद्रपुर आणि सिंदेवाही या तालुक्यातील हिंगनाळा अणि घोट या गावातील ५० शेतकरी लाभार्थ्यांच्या एकुण २० हेक्टरवर कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीतर्फे नुकतेच राबविण्यात आले.

शेतीदिनाचे आयोजन डॉ. व्ही. जी. नागदेवते, कार्यक्रम समन्वयक, कृविके,सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.उमाताई राजु लोनगाडगे,सरपंच हिंगनाळा होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत डॉ.विजय एन. सिडाम, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) कृविके, सिंदेवाही यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच कृषी विद्यापीठ विकसीत वाणाचा वापर करून कडधान्य पिकामधील उत्पन्न वाढवावे त्यातून शेतक-यांनी आपले उत्पन्न व कृषि क्षेत्रात विकास घडुन आणावा अशी अपेक्षा व्यक्त केले. शेतक-यांना प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलेल्या हरभरा या
पिकाची जॉकी -९२१८ या वाणाचे लागवड तंत्रज्ञानविषयी आणि हरभरा या पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.सोनाली लोखंडे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)यांनी माती परिक्षणाचे महत्व व पध्दत याविषयी प्रा. पी. पी. देशपांडे विषय विशेषज्ञ (पीकसंरक्षण)यांनी हरभरा पिकामधील एकात्मीक किड व रोग नियंत्रण विषयी आणि भास्कर एन.गायकवाड(कृषी अधिकारी)यांनी पिकेल ते विकेल अभियान तसेच शासनाच्या विविध योजना विषयी सखोल मार्गदर्शन केले. गजानन लोनगाडगे आणि आनंदराव लोनगाडगे या लाभार्थी शेतकरी, यांनी हरभरा या पिकाच्या जॉकी -९२१८ या वाणाच्या उत्पादनाविषयीक प्रात्यक्षिक राबवितांना कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याचे समाधान व्यक्त केले.
उपस्थित शेतक-यांना कृषी संवादीनीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.यु.एस.नाईक,कृ.स.हिंगनाळा यांनी
केले.
शेती दिनाला गावातील लाभार्थी शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. सदर शेतीदिनाचे आयोजन यशस्वीरीत्या राबविण्याकरीता व्ही.जी.माने,यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here