पचमढी येथील ‘महादेव यात्रा ‘ कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित

0
203

 

Mp होशंगाबाद

मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पचमढी येथील ‘महादेव यात्रा ‘ कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात अली आहे. होशंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. पी. माळी यांनी तसे आदेश काढले आहेत.

पचमढीला 3 ते 12 मार्चदरम्यान ही यात्रा आयोजित करण्यात आली होता. त्यात मध्यप्रदेशातील भाविकांबरोबरच विदर्भातून अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, तसेच महाराष्ट्र राज्यातून पुणे, जळगाव व आदी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक येत असतात. परंतु वाढते कोरोना संक्रमण पाहता गर्दी टाळण्यासाठी ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांनी घरीच पूजन करून सुरक्षितता जोपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here