*’घे भरारी’ महिला मंचाचा अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा*

186

*चंद्रपूर*– इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष श्री. बंडू धोत्रे यांनी स्थानिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला येथील ‘ घे भरारी ‘ महिला मंचाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे.
शहरातील ५०० वर्षापूर्वीची गोंडकालीन ऐतिहासिक वास्तू म्हणून रामाळा तलावाची ओळख आहे. ही ऐतिहासिक धरोहर चंद्रपूर चे भूषण आहे. परंतु, आजघडीला प्रदुषणामुळे या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था झाली आहे . त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला सुद्धा मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठीच या तलावाचे संवर्धन करणे गरजेचे आहे हे ओळखून इको – प्रो चे अध्यक्ष श्री. बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक *’घे भरारी ‘ महिला मंच* ने जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.
*’ घे भरारी ‘ महिला मंच* च्या पदाधिकारी महिला व सदस्य यांनी नुकतीच आंदोलन स्थळाला भेट देऊन पाठिंबा जाहिर केला आहे.