क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

0
152

क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करायंग चांदा ब्रिगेडची मागणी

मनपा आयुक्तांना निवेदन

    क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत आहे. त्यांच्या पूतळ्याची अवहेलना समाज कधीही खपवून घेणार नाही असा ईशारा देत त्यांचा पूतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे.

           यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी महिला आघाडीच्या शहर संघटीका वैशाली मेश्राम, महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, कृष्णा मसराम, नरेंन गेडाम, राम जंगम, राजेंद्र धुर्वे नितेश बोरकुटे, नागो मेश्राम, महेंद्र शेडमाके, विनोद तोडराम, शुभम मडावी, मनोहर मेश्राम, अनू चांदेकर, सोनू चांदेकर, लता पोरेते, विनोद अनंतवार, राहूल मोहूर्ले, वैशाली रामटेके आदिंची उपस्थिती होती.

       भारतीय आदिवासी अस्मितेचे प्रतिक, विश्वविख्यात उलगुलान जन आंदोलनाचे प्रणेते क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा जनतेच्या उस्फृर्त समर्थनाने चंद्रपूर रेल्वे स्थानका समोरील बिरसा मुंडा चौक येथे २१ फेब्रुवारीला बसविण्यात आला होता. परंतू चंद्रपूर शहर महानगर पालिकेने समजाला कोणतीही सूचना न देता सदर पुतळा  २७  फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास हटविला, हा अतिशय निंदनीय प्रकार असून प्रशासनाच्या या जनविरोधी कृत्यामूळे सर्वत्र असंतोष पसरला आहे. या घटनेविरोधात आदिवासींसह सर्व समाजामध्ये प्रचंड संतापाची भावणा पसरली असून याचे पडसाद आता राज्यासह परराज्यातही उमटू लागले आहे. चंद्रपूर येथील विविध संघटनांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देत जननायक बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्याबाबत निषेध नोंदविला आहे. त्यामूळे जनभावना लक्षात घेत हा पूतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करण्यात यावा अशी मागणी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here