मित्रानेच केली मित्राची चाकू भोकसत हत्या

0
295

स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक बाबुपेठ परिसरातील विक्तूबाबा मठाजवळील

घटना

चंद्रपूर : शहरात विक्तुबाबा मठाजवळ पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल मंगळवारी (२ माच) ला रात्री साडेनऊच्या नऊच्या सुमारास घडली आहे. सोनू राजेश चांदेकर असे मृत युवकाचे नाव असून तो बाबुपेठ येथील निवासी आहे. आज आरोपी पवन पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मृत आणि आरोपी दोघेही मित्र आहेत.

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ निवासी मृत सोनू चांदेकर आणि आरोपी पवन पाटील हे दोघेही मित्र आहेत. बाबुपेठ परिसरातील विक्तूबाबा मठाजवळ काल रात्री साडेनऊच्या सुमारास लोकांची चहलपहल सुरूच होती. दरम्यान या चौकातच उपस्थित असलेल्या दोघां मित्रात पैसाच्या कारणावरून भांडण झाले. भांडण इतके वाढले की, भांडणाचे पर्यावसान हत्येत झाले. आरोपी पवन पाटीलने सोनूच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याला मारण्यात आले, हे त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यदर्शीना समजले नाही.

धारातिर्थ पडलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. लगेच घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here