आईला वाचवण्यासाठी आलेल्या लहान भावाचे हातून मोठ्याची हत्या

0
310

⭕ मुल तालुक्यातील केळकर येथील घटना
⭕ आई लहान भावाला मोठा भाऊ दारूच्या नशेत करायचा शिवीगाळ
चंद्रपूर (प्रतिनिधी): ३ मार्च २०२१
दारूच्या नशेत तर्रर्र होवून आईला शिवीगाळ करीत असताना आईच्या बचावात आलेल्या लहान भावाने मोठ्याची हत्या केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुल तालुक्यातील केळझर येथे घडली. सुनिल राजाराम मानकर (40) असे मृत भावाचे नाव असून आरोपी लहान भाऊ सुभाष राजाराम मानकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन मूल हद्दीतील केळझर येथील निवासी सुनिल राजाराम मानकर हयाला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिवुन घरी येत असे आणि आई व लहान भावाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्याच्या या उपदव्यापामुळे आई व लहान भाऊ त्रस्त होते. काल मंगळवारी संध्याकाळी सहाचे सुमारास नेहमी प्रमाणे सुनिल मानकर हा दारू पिवून घरी आला. विनाकारण वाद करून आईला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी घरी असलेल्या लहान भाऊ सुभाष राजाम मानकर (३८) याने मोठ्या भावास भाऊ विनाकारण शिवीगाळ करू करण्यापासून रोखत, घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आईसोबतचे भांडण सुनिल आणि सुभाष मध्ये सुरू झाले. शाब्दीक वाद विकोपाला जाऊन हातघाईवर पोहोचले. मोठ्या भावाने लहान भावास जिवानीशी ठार मारण्याकरीता घरात ठेवलेली लोखंडी सळाख काढली आणि सुभाष वर वार केला. सुभाषने सुनिलचा प्रतिकार केला. अखेर संतापलेल्या सुभाषने लोखंडी सळाखीने सुनिललाच मारहाण केली. यात मोठाभाऊ सुनिल जागीच ठार झाला. सदर घटनेची माहिती मूल पोलीसांना होताच ठाणेदार सतिशसिंह राजपुत आणि सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे सहका-यांसह केळझर येथील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या प्रत्यक्ष पाहणी नंतर आई गिरीजाबाई मानकर हीच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेत सुभाष याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here