राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर ( सीटि ) जिल्हयाचा मुलांचा संघ उपविजेता

366

*चंद्रपूर वार्ता : हिमांशू पन्नासे*

राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर ( सीटि ) जिल्हयाचा मुलांचा संघ उपविजेता व मुलींचा संघ तृतिय स्थानावर तसेच सब ज्युनियर ( सीटि व ग्रामीण ) मुलांचा दोन्ही संघाला तृतिय स्थान प्राप्त

चंद्रपूर : विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, नागपूर ( वी.टि.बी.सी.ए. ) अंतर्गत १९वी सिनीयर व १२वी सब ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकताच सेंट उर्सुला हायस्कुल व ज्युनियर कॉलेज सदर, नागपुर येथे करण्यात आलेले होते. सदर स्पर्धेत विदर्भातील सर्व जिल्हयांनी सहभाग नोंदविला होता. या १९वी सिनीयर राज्यस्तरीय टेनिस बॉल किकेट स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर ( सीटि ) मुलांचा संघ पवन खनके (कर्णधार) यांच्या नेतृत्वा खाली उपविजेता ठरला तसेच मुलींचा संघाला रुचिता आंबेकर (कर्णधार) हिच्या नेतृत्वा खाली तृतिय स्थान प्राप्त झाले. व त्याच प्रमाणे १२ सब ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर (सीटि व ग्रामीण) मुलांचा दोन्ही संघाला तृतिय स्थान प्राप्त झाले. चंद्रा (सीटि) मुलांच्या संघाला प्रशिक्षक म्हणुन नरेंद्र सिह चंदेल तर व्यवस्थापक म्हणुन निखील पोटदुखे तसेच मुलींच्या संघाला प्रशिक्षक म्हणुन बंडु डोहे तर व्यवस्थापक म्हणुन वर्षा पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, लाभले होते. त्याच प्रमाणे सब ज्युनियर (सीटि) मुलांच्या संघाला प्रशिक्षक म्हणुन इखलाख पठान तर व्यवस्थापक म्हणुन हर्षल क्षिरसागर व सब ज्युनियर ( ग्रामीण) मुलांच्या संघाला प्रशिक्षक म्हणुन पुर्वा खेरकर तर व्यवस्थापक म्हणुन मनिषा नागोसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते

सदर स्पर्धेच्या यशाबद्दल टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर व इतर पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.