बिरसा मुंडा पुतळा स्थापने संदर्भात जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याशी चर्चा करणार- आ. मुनगंटीवार

0
149

*बिरसा मुंडा पुतळा स्थापने संदर्भात जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याशी चर्चा करणार- आ. मुनगंटीवार*
बिरसा मुंडा पुतळा पूर्ववत स्थापन करण्यासाठी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. मुनगंटीवार यांना
अ. भा. आदिवासी विकास परिषद तर्फे आज निवेदन देण्यात आले. तेव्हा बीरसा ब्रिगेड व इतर संघटनेचे पदाधिकारी, समाजसेवक तथा नगरसेवक यांच्या समवेत भाजप आदिवासी आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर रेल्वे स्टेशन जवळील बिरसामुंडा चौकात पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला तो मनपा प्रशासनाने कुठलीही नोटीस न देता हटविला. त्यामुळे मागील काही दिवसापासून आदिवासी समाजात तीव्र असंतोष वाढत असल्याने लगेच त्या दिवशी स्वतः महापौर यांनी आदिवासी समाज कार्यकर्त्यांन समोर मोबाईल
फोनद्वारे स्पीकरवर मनपा आयुक्त यांना विचारणा केली व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तेव्हा कुठलेही योग्य उत्तर न मिळाल्याने आज दिनांक 6 मार्च ला आ. मुनगंटीवार यांची भेट घेतली व चर्चा केली. मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला संपूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः येत्या 15 तारखेला मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. जननायक भगवान बिरसा मुंडा हे भारतातील थोर क्रांतिवीर होते तेव्हा त्यांचा सन्मान होणे गरजेचे असताना असे का घडले याबाबत चर्चेअंती आपण निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. त्यामुळे आदिवासी समाजाच्या आशा पल्लवित झाल्या व न्याय मिळेल अशा अपेक्षा केल्या जात आहे. सदर निवेदन देताना भाजपा आदिवासी आघाडी महानगर अध्यक्ष धनराज कोवे, महिला बालकल्याण सभापती चंद्रकला ताई सोयाम, विकास परिषद चे जिल्हा महासचिव कृष्णा मसराम, भागवत कुमरे, गणेश गेडाम, डॉ. पंकज कुळसंगे, अशोक तुमराम, भैय्याजी उईके, डॉ. प्रविण येरमे, हितेश मडावी, रवी मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here