अबब :- गुप्तधनासाठी डॉक्टरांचे कर्मकांड

0
1674

चंद्रपूर – तुमच्या घरी गुप्तधन आहे, बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी विशिष्ट पूजा करावी लागणार व या पूजेला तब्बल अडीच लाख रुपयांचा खर्च येणार असे सांगत नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.
आरोपी हे स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ग्रामीण लोकांसोबत संवाद साधत होते, असाच प्रकार गोंडसावरी या ठिकाणी घडला, गोंडसावरी येथील रवींद्र पेंदोर यांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेला दिली.
पेंदोर यांचे घरी गुप्तधन आहे ते काढायला तब्बल 2 लाख 50 हजारांचा खर्च येणार असल्याची माहिती पेंदोर यांना दिली.
आरोपी व बोगस आयुर्वेदिक डॉक्टर अजय पडियाल व सागर पडियाल यांना पेंदोर यांनी एडव्हान्स म्हणून 45 हजार रुपये दिले.
उर्वरित 2 लाख तात्काळ द्यावे यासाठी आरोपींनी पेंदोर कडे तगादा लावला व उर्वरित पैसे इंदिरा नगर चंद्रपूर येथे घेऊन येण्यास सांगितले.
गुप्तधनाच्या नावाने स्वतःची फसवणूक झाली
असल्याचे समजले असता त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार दिली असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार केले असता स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सागर पडियाल ला अटक केली, त्याने सांगितले की मी व माझे वडील आयुर्वेदिक डॉक्टर व पूजा करणारे महाराज म्हणून नागरिकांची फसवणूक केली असल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखेने फिर्यादी मार्फत मूल येथे तक्रार दाखल केली व पुढील तपास मूल पोलीस स्टेशनकडे वर्ग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here